| पेण | प्रतिनिधी |
शिहू तालुका पेण येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, शिहू विभाग यांच्यातर्फे युवा नेते प्रसाद भोईर यांच्या सौजन्याने शिवप्रताप दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शिव व्याख्याते गणेश बोर्गे, गणेश ताम्हाणे यांचे शिवप्रतापदिन विशेष पोवाडा, तसेच मैदानी साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास शिहू बेणसे विभागातील अबाल वृध्दांनी, शिवप्रेमींनी अभूतपूर्व अशी गर्दी करुन मोठया प्रमाणात दाद दिली.
सदर कार्यक्रम प्रसंगी पेण विधानसभा माजी आ. धैर्यशील पाटील, युवा नेते प्रसाद भोईर, माजी सभापती संजय भोईर, शिहू सरपंच पल्लवी भोईर, सभापती मनिषा भोईर, उपसरपंच सुजित गदमळे आदि मान्यवर उपस्थित होते. युवा नेते भोईर यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिहू विभाग यांच्या कार्यकर्त्यांचे व त्यांच्या निटनेटक्या कार्यक्रम आयोजनाचे कौतुक करुन त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच हिंदू धर्माच्या शिकवणुकीच्या, संस्कारांच्या प्रसाराच्या कामाबद्दल सर्व समाजातर्फे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिहू विभागाचे प्रमुख कार्यकर्ते महेंद्र गदमळे, प्रफु ल्ल पाटील, योगेश ठाकूर, एकनाथ पाटील, शशिकांत शेळके, पवन शेळके, राज गदमळे, रविंद्र शेळके, नितीन पाटील, शुभम मोकल तसेच इतर कार्यर्त्यांनी मेहनत घेतली.
मैदानी साहसी खेळाने लहान पिढीवर असे संस्कार घडणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि असा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिहू व प्रसाद भोईर यांचे कौतुक, तालुक्यात इतरत्रही असे कार्यक्रम आयोजित व्हावेत जेणेकरुन शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अधिक खोलवर मनामनात रुजविला जाईल. – माजी आ. धैर्यशील पाटील, पेण विधानसभा