आ. सुनील शेळके आयोजित रिल्स स्टार स्पर्धा; खोपोलीची कन्या शिवन्या बोराडे चमकली

चौथ्या क्रमांकाची ठरली मानकरी

| खोपोली | प्रतिनिधी |

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घुले मित्र परिवाराच्या वतीने रिल्स स्टार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केली. खोपोलीतील दोन वर्षांची असलेली शिवन्या बोराडे हिने छाप पडत स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला. त्यामुळे शिवन्या बोराडेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवत प्रशिक्षकांबरोबर आयोजकांवर भुरळ पाडली. या स्पर्धेत शिवन्या बोराडे या चिमुकलीने चतुर्थ क्रमांक पटकावला. तिने सादर केलेल्या कलेला सर्वांची वाहवा मिळवली. याबद्दल आयोजक अनिकेत घुले यांच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन तिला गौरवण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमन नलावडे व अमीन खान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सोशल मीडियातील विविध माध्यमातून अनेकजण प्रकाशझोतात येत आहेत, तर अशाच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घुले यांनी रील स्टार स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केली. खोपोलीच्या कन्येने उत्कृष्ट कला सादर करत चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. शिवन्या बोराडे हिला इंस्टाग्रामवर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून, 45 हजारांच्या वर फॉलोअर्स आहेत.

Exit mobile version