। खोपोली । प्रतिनिधी ।
पेण येथे वैकुंठ दादा पाटील मित्र मंडळाच्या आयोजनातून सोमवारी (दि.19) जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य जलतरणपटूंनी सहभाग दर्शवत आपला खेळ प्रदर्शित केला. तसेच, 10 वर्षाखालील वयोगटात खोपोलीतील अक्वाहॉलिक स्विमिंग क्लास मधील जिज्ञा देवेंद्र येशीकर हिने द्वितीय क्रमांक पटकवत चमकदार कामगिरी केली आहे.
नुकतीच पेण येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा अटीतटीचे लढतील पार पडली. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धकांना जिल्हास्तरीय खेळ खेळण्यास संधी मिळाल्याने आयोजक वैकुंठ दादा पाटील मित्र मंडळ पेणचे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत खोपोलीतील अक्वाहॉलिक स्विमिंग क्लास मधील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत आपले वर्चस्व दाखवून दिले असता 10 वर्षाखालील वयोगटात खोपोलीतील अक्वाहॉलिक स्विमिंग क्लास मधील जिज्ञा देवेंद्र येशीकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर, आराध्या देशमुख, तिर्थ तावडे, श्रीशांक भालेराव, अद्वैत या लहानग्यानी या स्पर्धेत यशस्वीपणे सहभागी घेत खोपोलीचे नाव उज्वल केले.