शिवराज राक्षे दुसऱ्यांदा ‌‘महाराष्ट्र केसरी’

हर्षवर्धन सदगीरला धूळ चारत पटावली मानाची गदा

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवराज राक्षे हा 65 व्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. शिवराज राक्षे आणि हर्षवधान सद्शगीर या मोठ्या कुस्तीपटूंमध्ये ही अटीतटीची स्पर्धा रंगली. शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीरवर एकतर्फी मात देऊन ‘महाराष्ट्र केसरी किताब’ दुसऱ्यांदा पटकावला आहे. अत्यंत कडव्या लढतीत राक्षे याने सादगीरला धूळ चारत मानाची गदा पटकावली.

धाराशिवच्या श्री तुळजाभवानी स्टेडियमवर गुरुवर्य के.टी. पाटील क्रीडांगरीत या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील जवळपास 900 पैलवानांनी यात सहभाग घेतला होता. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा विजयी पैलवान शिवराज राक्षे याला 65 वा महाराष्ट्र केसरी किताब, तीस लाख किमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि मोहोळ घरण्याकडून परंपरागत चालत आलेली चांदीची गदा बहाल करण्यात आली. तर सोबतच उपविजेता मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला महिंद्रा 575 डीआय व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.

शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन यांच्यात झालेल्या मॅटवरील कुस्तीत शिवराजने 6-0 गुणांनी नांदेडचा मल्ल राक्षे या याने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला. तर सामान्यांच्या 1.42 व्या मिनिटाला हर्षवर्धन सदगीर याच्या उजव्या हाताला झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला.

Exit mobile version