16 जुलै रोजी शिवसंवाद मेळावा

| उरण | वार्ताहर |

युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा उरण विधानसभेतील ‘शिवसंवाद दौरा’ यशस्वी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे मंगळवार, दि. 16 जुलै रोजी उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसंवाद मेळाव्यासाठी उरणमध्ये येत आहेत. हा मेळावा जेएनपीटी टाऊनशिपच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे. त्यांच्या या शिवसंवाद मेळाव्याच्या आयोजनासाठी शिवसेना उरण तालुक्यातील पदाधिकार्‍यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.

या बैठकीमध्ये मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या बैठकीला माजी सभापती विश्‍वास म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुका संघटक रुपेश पाटील, अमित भगत, के. एम. घरत, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, विभागप्रमुख एस. के. पुरो, द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version