शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या

। अमृतसर । वृत्तसंस्था ।
पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमृतसरमध्येे मजीठा रस्त्यावरील गोपाल मंदिराबाहेर सुरी यांच्यावर एका युवकाने गोळीबार केला.आंदोलन करीत असतांना अचानक गर्दीतून त्यांच्या दिशेने गोळीबार झाला.

त्यानंतर सुरी यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलेय. सुरी यांना पंजाब सरकारने सुरक्षादेखील पुरवली होती. मात्र या गोळीबारामध्ये सुरी यांचा मृत्यू झाला आहे. पंजाब शिवसेनेमध्ये अनेक गटतट आहेत. शिवाय अनेक मशिवसेनाफदेखील आहेत. टकसाली शिवसेनेचे नेते सुधीर सुरी हे आक्रमक नेते होते. त्यांच्या अनेक विधानांवरुन वाद पेटलेला आहे.

Exit mobile version