अकोल्यात शिवशाही बसला अचानक लागली आग

| अकोला | वार्ताहर |

शेगाव येथून अकोल्याकडे येत असलेली भरधाव शिवशाहीने अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी (दि.25) जुलै रोजी दुपारी 1 वाजताचे सुमारास रिधोरा नजीक घडली आहे.

चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील 44 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली. विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी. एन. डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना रिधाेरानजीकच्या हॉटेल तुषार समोर आली असता तांत्रिक कारणामुळे चालकाच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबविली व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही.

Exit mobile version