पनवेलमध्ये अवतरली शिवशाही

राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित दुर्गदर्शन सोहळा
। पनवेल । वार्ताहर ।
दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने पनवेल येथे श्री सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या दुर्ग दर्शन सोहळ्याचे उद्घाटन (23) पार पडले. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16 वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते किल्ला उभारणीपर्यंत विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. प्रेम,ओंकार,चैतन्य, पार्थ, श्रेयस, मंदार, अजय, प्रसाद, पायल, सूरज, संग्राम, शुभम, कल्पेश 10 दिवसात किल्ला प्रतिकृती पूर्ण केली. दगड माती विटा वापरून हा किल्ला बनविण्यात आला आहे. अभ्यास मोहिमे दरम्यान किल्ल्याचा इतिहास समजून फोटोग्राफी करण्यात आली. त्यानंतर किल्ल्याची मोजणी करून गुगलच्या साहाय्याने मॅप तयार करण्यात आला.

Exit mobile version