| रसायनी | प्रतिनिधी |
बारवई ग्रामपंचायत हद्दीतील भाजपाचे अनेक कार्यकर्ते माजी आमदार मनोहर भोईर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे बारवईत भाजपला मोठ्या धक्का बसला आहे.
यावेळी बारवई ग्रामपंचायत हद्दीतील भाजपा कार्यकर्त्यांचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.29) दुपारी भगवे शिवबंधन बांधून शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी हातात भगवा ध्वज घेऊन आम्ही शेवटपर्यंत माजी आमदार मनोहर भोईर यांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असा निर्धार केला. यावेळी भालचंद्र सुदाम बाबरे, हनुमंत धावारे, रुपेश बाबरे, प्रणय बाबरे, गुड्डू खान, अक्षय बाबरे, विकी खंडागळे, आशिष बाबरे, राहूल बाबरे, करण बाबरे, विजय गायकवाड, नितेश बाबरे, अनंता खंडागळे, हनुमंत धावारे आदींनी पक्षप्रवेश केला.
यावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, प्रभारी सरपंच मोहन लबडे, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश बाबरे, उपतालुका संघटक सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.