धक्कादायक! २३ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार

। पुणे । वार्ताहर।
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे २३ वर्षीय दिव्यांग मुलीववर बलात्कार झाल्याची घटना घडली. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे शेजारी राहणाऱ्या किशोरवयीन मुलानं २३ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी १४ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज त्याला बालन्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


तरुणी तिची आई आणि मावशीसोबत राहत असून कामानिमित्त दिवसभर घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शेजारच्या किशोरवयीन मुलाने घरात घुसून १६ आणि १८ हे दोनदिवस या तरुणीवर बलात्कार केला.
सदर तरुणीची मावशी बुधवारी दुपारी घरी परतली असता तरुणी अस्वस्थ आणि हादरलेली दिसली. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता शेजारच्या किशोरवयीन मुलाने तरुणीवर बलात्कार केल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चौकशी केली असता, १६ आणि १८ मे रोजी तरुणीचे कुटुंबीय घरी नसताना तिच्यावर दोनवेळा बलात्कार केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर मुलाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी बालन्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version