धक्कादायक! माणगावात सापडले 8 बॉम्ब

बॉम्‍बशोधक आणि नाशक पथकाची कारवाई
ब्रुनो श्‍वानाची महत्‍वपूर्ण कामगिरी
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्‍यातील पाणसई इथं पोलीसांनी केलेल्‍या कारवाईत 8 जिवंत बॉम्‍ब हस्‍तगत केले आहेत. पहाटे साडेचार करंजवाडी आदिवासी वाडीवर बॉम्‍बशोधक आणि नाशक पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ब्रुनो नावाच्‍या श्‍वानाने महत्‍वाची कामगिरी बजावली.

करंजवाडी आदिवासीवाडीवर गावठी बॉम्‍ब असल्‍याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्‍यानुसार मध्‍यरात्री पासूनच या भागात फिल्‍डींग लावण्‍यात आली. पहाटे साडेचार वाजता तिथं धाड टाकून 8 जिवंत गावठी बॉम्‍ब हस्‍तगत केले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्‍हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. भोईर, हेड कॉन्‍स्‍टेबल भूपेंद्र देसाई , संतोष राऊत, राहुल पाटील, शैलेश गोतावडे, जितेंद्र सातोडे यांनी या कारवाईत भाग घेतला. डुक्‍कर किंवा तत्‍सम जंगली प्राण्‍यांची शिकार करण्‍यासाठी हे बॉम्‍ब तयार करण्‍यात आले होते अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. हे आदिवासी स्‍वतःच असे बॉम्‍ब तयार करत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version