माणगाव | प्रतिनिधी |
मच्छी व जंगली जनावरे मारण्यासाठी तयार करण्यात आलेले गावठी हात बॉम्ब हाताळत असताना झालेल्या स्फोट प्रकरणी जप्त करण्यात आलेले ते 25 हातबॉम्ब न्यायालयीन प्रक्रियेनंतर नष्ट केले जाणार आहेत.
या घटनेत घटनास्थळी श्वानपथकाच्या साहाय्याने एका झाडाजवळ सापडलेले 25 गावठी हातबॉम्ब रायगड पोलिसांनी दक्षता घेत बॉम्ब शोधत व नाशक पथक यांच्या मदतीने माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील मॅगझीन (स्फोटक ठेवण्याची सुरक्षित जागा) याठिकाणी हलविण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानंतर या बॉम्बची विल्हेवाट लावण्यात येईल असेही पोलीस सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले.
या दुर्घटनेत एक ठार तर 10 वर्षाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक औषधोपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असून जखमी महिलाहि त्याठिकाणी औषोधोपचार घेत आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली.