धक्कादायक! एका केकमुळे झाला वाद; पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ती म्हणजे एका ईसमाने वाढदिवसाचा केक आणण्यास उशीर झाला म्हणून आपल्या पत्नी आणि मुलावर प्राणघातक हल्ला केला आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. राजेंद्र शिंदे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजेंद्र शिंदे लातूरला पळून गेला होता. पत्नीने दिलेल्या माहीती नुसार ती साकीनाका परिसरात पती आणि मुलासोबत रहायची. पतीच्या वाढदिवसाला ही घटना घडली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केक आणायला पतीने सांगीतले. मात्र, केक प्री ऑर्डर करूनही केक उशिरा आला. यामुळे पती चीडला. दोघांमध्ये वाद झाला. वाद सुरू असतांनाच पतीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलाने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पतीचा राग अनावर झाला पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने त्याने हल्ला केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी मुलाच्या पोटात वार केले.

घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलीसांनी घटनास्थळी प्राचारण केले. जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या मुलावर अद्याप उपचार सुरू आहेत.

Exit mobile version