धक्कादायक! तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

| पुणे | प्रतिनिधी |

जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कोंढवळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तरुणी समवेत तिच्या घरचे शेतात काम करत होते. त्यावेळी तरुणीने आरोप केलेले संबंधित नागरिक ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर 25 ते 30 जण येऊन थेट तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.

Exit mobile version