| पनवेल | प्रतिनिधी |
22 वर्षीय तरुणीला घरातील अतिरिक्त घरकाम लावून घराबाहेर पडण्यास अटकाव केला आणि मारहाण केली तसेच एकाने अश्लील शिवीगाळ करून स्पर्श केला. या प्रकरणी दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 22 वर्षीय तरुणी मूळची कोलकत्ता येथील असून, ती गोरेगाव येथे राहते. खारघर येथील तरुणांनी तरुणीला अतिरिक्त घरकाम लावून घराबाहेर पडण्यास अटकाव केला आणि तिला हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच आरोपी जाफर शेख यांनी अश्लील शिवीगाळ करून वेळोवेळी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.







