धक्कादायक! भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

| जैसलमेर | वृत्तसंस्था |

भारतीय हवाई दलाचे यूएव्ही विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमित उड्डाण करत होते. जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे. पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ते टोही विमान असू शकते. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी परमवीर सिंग रावलोत यांनी सांगितले की, हे विमान पडले तेव्हा आम्ही ट्यूबवेलवर बसलो होतो. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला मोठी आग लागली आहे, त्यामुळे ते जळून राख झाले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली आहे.

Exit mobile version