| पुणे | वृत्तसंस्था |
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात नुकतेच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. यात काही गुंडांनी भररस्त्यात राडा केला आहे.
पुण्यातील खडकवासला भागातील गोऱ्हे बुद्रुक या ठिकाणी ही घटना बुधवारी (दि.6) रात्री घडली असून काही लोक रस्त्यावर एका गाडीची वाट बघत होते. गाडी समोर येताच गुंडांनी गाडी अडवून त्यावर बसलेल्या 3 जणांवर कोयता आणि तलवारीने हल्ला केला.