। बीड । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून खासदार प्रीतम मुंडे या घटनास्थळी दाखल झाल्या.