| लंडन | वृत्तसंस्था |
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान इंग्लंडमध्ये टी-20 ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत रोज एकाहून एक रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. नुकताच या स्पर्धेतील एक व्हिडिओ समोर आला. व्हिडिओत गोलंदाज स्वत:ला वाचवण्यासाठी एका हाताने धक्कादायक झेल घेताना दिसत आहे. या झेलने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
टी-20 ब्लास्टमध्ये खेळल्या गेलेल्या डरहम विरुद्ध लँकशायर सामन्यात पॉल कफलिन गोलंदाजी करत होता, तर फलंदाज मॅथ्यू हर्स्ट स्ट्राईकवर होता. त्याने पॉल कफलिनच्या चेंडूवर समोरच्या दिशेने जोरात फटका मारला. चेंडू सरळ कफलिच्या दिशेने येत होता, ज्यापासून वाचण्यासाठी त्याने हात वर केला. कफलिनने जसा हात वर केला, तसा चेंडू त्याच्या हातात येऊन अडकला आणि फलंदाज झेलबाद झाला. कफलिनचा हा धक्कादायक झेल पाहून स्टेडियममधील सर्वच जण हैराण झाले होते. समालोचकांचाही यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या तोडून शब्दच फुटत नव्हते. खुद्द फलंदाज हर्स्ट देखील हा झेल पाहून काही क्षणासाठी स्तब्ध झाला होता.