। पनवेल । वार्ताहर |
पनवेल शहरालगत करंजाडे वसाहतीत तलावा शेजारील गटारात सोमवारी (दि.5) सकाळी मृतावस्थेतील अर्भक आढळून आले आहे. याची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आर-2 परिसरात भूखंड क्रमांक 4 समोर असलेल्या तलावातील पाणी काढण्याचे काम सुरू होते. याच वेळी तलावाशेजारील गटाराचे झाकण उघडे असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. तेथे गटारात काहीतरी अडकल्याचे दिसल्यावर पाहणी केली असता त्यात मृतावस्थेतील अर्भक आढळले.







