| नाशिक | वृत्तसंस्था |
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेखानगर येथे गौळणे गावाचे सरपंच यांच्यावर गुरुवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजिंक्य चुंभळे हे लेखानगर येथे त्यांच्या कार्यालयात असताना हल्ला करण्यात आला. कार्यालयात गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
अजिंक्य चुंभळे यांच्यावर अज्ञात पाच-सहा समाजकंटकांनी एका भुर्जी विक्रेते व या परिसरात नेहमीच गुंडागर्दी करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वाद मिटत नसल्याने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचा राग आल्याने काही वेळाने हे गावगुंड हातात धारदार चॉपर घेऊन आले. यावेळी बेसावध असलेल्या चुंभळे यांच्यावर प्राणघातक हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला करण्यासाठी आलेल्या समाजकंटकांपैकी एकाने मी अल्पवयीन आहे. हत्यार माझ्याकडे द्या, मी हल्ला करतो. माझ्यावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ शकत होणार नाही, असे वक्तव्य केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याचे बघताच हल्लेखोरांनी येथून पळ काढला. पोलिसांना ही बाब समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. अजिंक्य चुंभळे यांना समजावून सांगत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.