धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

| वर्धा | वृत्तसंस्था |

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सहा वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. मारेकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरात कुणी नसल्याले पाहून घराच्या आवारातच या तरुणाने हल्ला केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून संतप्त होत या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संदीप मसराम असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी तरुणाचं नाव असून हा तरुण जखमी तरुणीच्या गावातीलच आहे. तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. दरम्यान ती आपल्या अंगणात काम करत असताना त्याचवेळी संशयित आरोपी संदीप तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार केले. आरडाओरड झाली असता संदीपने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. लागलीच प्रसंगावधान राखत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर दुसरीकडे पळ काढणाऱ्य मारेकरी तरुणाला गावकऱ्यांनी पकडन चांगलाच चोप दिला. सध्या पीडित युवतीवर सावंगी तर तरुणावर संशयित आरोपी संदीपवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचत त्यांनी पुढील तपास सुरू केला.

Exit mobile version