। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील पाली बुद्रुक येथे जाणार्या वालीचा डोह रस्त्यावर एका इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने एका 80 वर्षीय वृद्ध इसमाची हत्या केल्याची घटना घडली.
पांडुरंग मर्या मते असे या मयत वृद्ध इसमाचे नाव आहे. अज्ञात इसमाने धारधार हत्याराने त्यांच्या कपाळावर, चेहर्यावर व डोक्याच्या पाठीमागे वार करून त्यांना ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहत्या पाण्यात टाकून दिला.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश खेडकर व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.