धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बेपत्ता

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील वेश्‍वी गावातील अल्पवयीन तरुणी जुन महिन्यात बेपत्ता झाली आहे. तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

बेपत्ता मुलीचे नाव रिवानी अजय सिंग (17, रा.वेश्‍वी गाव-उरण) असे असून रंग-सावळा, उंची-4.5 फुट, केस काळे, नाक-लांब, डोळे-काळे, चेहरा-गोल, अंगाने सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचा टॉप, गुलाबी रंगाची लेंगीन्स, भाषा मराठी-हिंदी या वर्णनाची मुलगी 20 जुन रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. ही घटना घडताच अज्ञात व्यक्ती विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिरुध गीजे करीत आहेत.

Exit mobile version