धक्कादायक! पुण्यात पाक झिंदाबादच्या घोषणा

सक्त कारवाई करु- देवेंद्र फडणवीस

। नागपूर । प्रतिनिधी ।

पुण्यात पी.एफ.आयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. अशा घोषणा देणार्‍यांना सोडणार नाही, त्याला शोधून त्यावर कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हूं अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे.

पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ए.एन.आयने छापे घातले आणि पी.एफ.आयच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Exit mobile version