धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

। महाड । प्रतिनिधी । 

तालुक्यातील खर्डी गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहत असलेल्या एका तरुणाने जबरदस्ती करत बलात्कार केला. आरोपीवर महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये बालकांचा लैंगिक संरक्षण अधिनियम अंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड तालुक्यातील खर्डी गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत सचिन मदन सुतार (पंदेरकर) हा त्रास देत होता. वेळोवेळी घरात आंघोळ करत असताना हा तरुण डोकावून पाहायचा. शुक्रवारी (दि.22) पीडित मुलगी अंघोळ करून किचनमध्ये आली असता आरोपीने घरात घुसून तिचे तोंड दाबून जबरदस्ती करत बलात्कार केला. केलेल्या तक्रारीनुसार सचिन मदन सुतार याच्यावर बलात्काराचा तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी.गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version