‘गुड टच बॅड टच’मुळे नराधम नातेवाईकांच धक्कादायक वास्तव आलं समोर!

। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यात ‘गुड टच बॅड टच’मुळे नराधम नातेवाईकांच धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पुण्यातील ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समजावून सांगत असताना हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार वर्षांपासून होत होते लैंगिक अत्याचार!
2020 मध्ये पीडित मुलीवर मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी देखील दिली होती तर आजोबांनी आणि चुलत मामांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केले होते. सोबतच हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरु असल्याचे तपासात समोर आले. पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Exit mobile version