| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात गोळीबाराच्या घटनादेखील वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबार झाल्यानंतर आता येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा दोघांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचेदेखील पोलीस तपासात समोर आलं आहे. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्षृल्लक वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे.