| जळगाव | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोन गावाजवळील स्मशानभूमीजवळ धावत्या बसचा अपघात झाला. चालकाचा भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांद्यावर धडकल्याने अपघात झाला, सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. मात्र, या दुर्घटनेत बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लाडली येथून निघून ही बस जळगाव येथे रेल मार्गे येत असताना दोनगाव गावाजवळील स्मशानभूमीनजीक अपघात घडला. धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे आज लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाले पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना अपघाताची दुर्दैवी घटना घडली. येथील दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ येताच भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने बसमधून उतरवत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.