धक्कादायक! वर्गाची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी

| मुंबई | प्रतिनिधी |

गुजरात राज्यातील वडोदरा येथील श्री नारायण गुरुकूल स्कूलमध्ये शुक्रवारी (दि.19) दुपारी 12.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या शाळेत पहिल्या माळ्यावरील एका वर्गात मुले मध्यल्या सुट्टीत जेवण करत होती. त्यावेळी अचानक वर्गाची भिंत कोसळली. या घटनेत सहा विद्यार्थी बेंचसह १० फूट खाली पडले. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत त्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान ही घटना घडली. विद्यार्थीच्या सायकलींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

शाळेच्या मुख्याध्यापिका रुपल शाह यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. आम्ही अचानकपणे मोठा आवाज ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेले असे रुपल शाह यांनी सांगितले. ही भिंत कोसळून बाजूच्या मोकळ्या मैदानात पडली. भिंतीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात विद्यार्थ्यांच्या सायकल ठेवल्या जायच्या दुर्घटनेत काही सायकलींची मोडतोड झाली आहे.

Exit mobile version