| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले आहे.
मुलीचे नाव लिपी रस्तोगी असे आहे. असून ती 26 वर्षांची आहे. मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये हे आयएएस दाम्पत्य राहतात. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची इमारतीवरुन पहाटे चार वाजता राहत्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. घरातून मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.