| छत्तीसगढ | वृत्तसंस्था |
छत्तीसगढ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन शिक्षकांनी मिळून विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 3 शिक्षकांनी ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या कुकर्मात डेप्युटी रेंजरनेही सहकार्य केले आहे. याप्रकरणी एमसीबी जिल्हा पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून मंगळवारी त्यांची कारागृहात रवानगी केली. वास्तविक, एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याचा अश्लील व्हिडिओ बनवला होता आणि तो दाखवून तीला ब्लॅकमेल केले जात होते. आठवडाभरात शिक्षकांनी विद्यार्थिनीला दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.