10-11 अज्ञातांकडून खून
| जालना | वृत्तसंस्था |
जालनामध्ये खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या एका तरुणाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे. 10 ते 11 अज्ञातांकडून दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्याच्या मंठा चौफुली भागातील ही घटना आहे. भर दिवसा झालेल्या या हत्येची अंगावर काटा आणणारी दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत. शेख खुसरो शेख मंजूर असे या खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणाने एका तरुणीचा खून केला होता. त्या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या या आरोपीने सोमवारी (दि.5) रात्री जालन्यातील एका तरुणीची हत्या केली होती. प्रथमिक माहितीनुसार ही घटना किरकोळ वादातून घडल्याचे सांगण्यात आले असले तरी या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.
चाकू आणि दगडाने वार
जालन्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या तरुणाच्या हत्येत 10ते 11 अज्ञातांनी या तरुणावर चाकूने व दगडाने वार केले. यातच या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळते. या घटनेची दृश्य मोबाइलमध्ये कैद झाली आहेत. या तरुणाचे वय 20 असून खुनाच्या आरोपात असल्याचे सांगण्यात आले.