| कोलकाता | वृत्तसंस्था |
आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरसोबत अत्यंत भयानक घटना घडली आहे. महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूर, अमानवीय अत्याचार करण्यात आले. महिला डॉक्टरसोबत जे झाले, त्याने सगळ्यानाच हादरवून सोडल आहे. महिला डॉक्टरवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. महिला डॉक्टर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एक अटक केली. स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. शरीरावर कुठे-कुठे जखमा ती ट्रेनी डॉक्टर सेकंड ईयरची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी बेशुद्धवस्थेत सेमिनार हॉलमध्ये सापडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेले. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. शव विच्छेदनातून लैंगिक छळ आणि त्यानंतर हत्या झाल्याच समोर आले आहे. पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येते होते. चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पोट, गळा, ओठ आणि उजव्या हातावर जखमा आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद आहे. मुलीने जीवन संपवून घेतल्याची आम्हाला माहिती देण्यात आली होती, असा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालयाला हे प्रकरण दाबायच आहे, असा नातेवाईकांचा आरोप आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरजी कर मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. चिडलेले डॉक्टर संपावर गेले आहेत. सकाळी 3 ते 6 च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.