बेसबॉल सामन्याच्यावेळी गोळीबार ; खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ

एका महिला दर्शकासह तिघेजण जखमी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अमेरिकेतील वॉशिंग्टन नॅशनल्स येथील सुरु असलेल्या सामन्यात झालेल्या गोळीबारात एका महिला दर्शकासह तिघेजण जखमी झाले आहेत. प्रेक्षकांनी तुंडुब भरलेल्या मैदानात बेसबॉलचा सामना सुरु असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि बघता-बघता सर्वत्र हाहाकार माजला. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांची दाणादाण उडाली. एक बेसबॉलचा सामना नऊ इनिंगचा असतो. पण, अमेरिकेत शनिवारी रात्री सुरु असलेला अटीतटीचा सामना आठव्या इनिंगमध्येच असताना अचानक मैदानाबाहेर गोळीबार झाला आणि बघता-बघता सर्वांचीच तारांबळ उडाली. गोळ्यांच्या धाड-धाड आवाजाने सर्वंचजण घाबरले. खेळाडू मैदानातून पळू लागले तर प्रेक्षकांची हालतही खराब झाली.

Exit mobile version