खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

| मुंबई | प्रतिनिधी |

जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आधी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील जुहू भागात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातही पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना आणि शूटर्सना अटक केली आहे.

Exit mobile version