दिल्लीच्या न्यायालयात शूटआऊट

गँगस्टरसह तिघांची हत्या; तिघे गंभीर जखमी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका गँगस्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावेळी हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. वकिलांच्या वेशात येऊन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. दरम्यान, पोलीस आणि हल्लेखोर यांच्यात झालेल्या धुमश्‍चक्रीत गँगस्टर जितेंदर गोगी याच्यासह इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. गोगी म्हणजेच जितेंदर मान यास पोलिसांनी सुनावणीसाठी रोहिणी येथील न्यायालयात आणले, त्याचवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले असून, गोगी यांना रुग्णालयात हलवण्यात आले, असे रोहिणीच्या पोलीस उपायुक्तांकडून सांगण्यात आले. गँगस्टर गोगी उर्फ जितेंद्र मानला रोहिणी कोर्टात सुनावणीसाठी नेत असताना दोन गुन्हेगारांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही गुन्हेगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version