चिकनच्या उधारीवरुन दुकानदार,ग्राहकांमध्ये मारामारी

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
चिकनचे पैसे मागण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी होण्याची घटना कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चिकनचे पैसे मागण्याकरीता फिर्यादी गेले असता आरोपीने,एक तासानंतर तुझे बिलाचे दोन हजार रुपये घ्यायला ये,असे म्हणाला. त्यावर फिर्यादी त्याला म्हणाला की, तु माझे चिकनचे पैसे रोखीने देत नसल्याने, तुला उद्यापासुन उधारीवर चिकनचा माल देणार नाही. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीन फिर्यादी यांस उधारीचे पैसे न देता शिवीगाळी दमदाटी केली .
त्यावेळी तेथे समक्ष हजर असलेल्या आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीस शिवीगाळी दमदाटी करुन धक्काबुक्की केली. तसेच मुख्या आरोपीने मारहाण करीत फिर्यादीला खाली पाडले आणि त्याला बांबुच्या लाकडी दांडक्याने फिर्यादी मारहाण केली. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार जगताप करीत आहेत.

Exit mobile version