। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे येथे जागेला कुंपण घालत असता झालेल्या वादात हाणामारी व शिवीगाळ करण्यात आली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावळे गावात फिर्यादी व त्यांचा मुलगा जागेला कुंपण घालत असता त्या ठिकाणी दुसरे इसम आले. त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळी करुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादी यांच्या घरावर दगड मारुन घराच्या खिडकिच्या काचा फोडून नुकसान केले. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार अण्णासाहेब तोरवे हे करीत आहेत.