। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आषाणे येथील एका इसमाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने संबंधित पीडित कुमारीका गर्भवती राहिली. तिला अपत्य झाल्याने पीडितेने कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील आषाणे येथील एक इसम हा मार्च 2024 ते एप्रिल 2024 या कालावधीत आषाणे, ता. कर्जत येथे कुमारी फिर्यादी हिच्या राहत्या घरी जाऊन फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील तिच्यासोबत तीन ते चार वेळा शरीरसंबंध ठेवले. त्यातून फिर्यादी ही गर्भवती राहून नंतर तिला अपत्य प्राप्त झाले. या गुन्ह्यातील आरोपीस दि. 14 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस अधिकारी जयवंत वारा हे करीत आहेत.