। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील पाले खुर्द येथील विकास नारायण दुर्गे (50) हा त्याच्या मालकीच्या जागेत अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करत असल्याची माहीत तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी 1 हजार 407 सिलेंडर मिळून आले. त्यापैकी 438 भरलेले व 969 रिकामे सिलेंडर मिळून आले आहेत. तसेच, विकास दुर्गे यांच्याकडे सिलेंडर गॅस विक्रीचे व साठवणूक करण्याचे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे विकास दुर्गे यांच्यासह चालक बबलू पवार (51) व लखन जाधव (23) यांना अटक करण्यात आली आहे.