| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील चिरनेर गावचे गायक मनोहर फुंडेकर लिखित शॉर्टफिल्मला नुकताच ‘बेस्ट ऑफ मुव्ही’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आर्यारावी एंटरटेनमेंट आयोजित राष्ट्रीय लघुचित्रपट फिल्म महोत्सव फेस्टिवल नुकताच संपन्न झाला. या प्रथम फेस्टिव्हलमध्ये उरण तालुक्यातील चिरनेर गावचा गायक मनोहर फुंडेकर लिखित दिग्दर्शक वंश मुव्हीज प्रोडक्शनखाली तयार करण्यात आलेली ‘चावी द की..’ ही शॉर्टफिल्म सादर करण्यात आली.
या मुव्हीला ‘बेस्ट ऑफ मुव्ही’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्यात आला.यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खापरे, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाडवे, रात्रीस खेळ चालेतील कलाकार संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडे आदींकडून कौतुक करण्यात आले