कोलाड बाजारपेठत ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

। सुतारवाडी । वार्ताहर ।
दिवाळी सणाला सुरुवात झाली असून लक्ष्मीपूजन, पाडवा तर भाऊबीज असे सण आले असून विविध साहित्यांनी कोलाड, धाटाव, रोहा परिसरातील बाजारपेठा सजल्या आहेत. या वर्षी चिनी मातीच्या पणत्या व चिनी बनावट वस्तू फारशा दिसल्या नाहीत. त्याचप्रमाणे ठराविक फटाक्यांची दुकानं दिसत आहेत. आकाश कंदिल विविध आकारात आकर्षकपणे विक्रीस उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे रांगोळीचे रंग ग्राहकांची मने आकर्षण करून घेत आहेत. लक्ष्मी पुजनासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. बाजार पेठेतील कपड्यांची तसेच भांडी व सोन्याचांदीच्या दुकानांवर गर्दी जाणवत होती. या वर्षीं सण साजरे करता येणार असल्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत आहे. परंतु बाजारपेठेत खरेदीला मात्र ग्राहकांचा अल्प प्रतिसाद असल्याचा दिसून येत आहे.

Exit mobile version