रोह्यात रासायनिक खतांचा तुटवडा

दुबार भातपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची बोंब
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कोलाड खांब विभागात रासायनिक तथा युरिया खतासाठी शेतकरी वर्गाची वणवण होत असून भातशेतीच्या कामासाठी खताची मोठी बोंब सुरू झाली आहे. खरीप हंगामा नंतर काही शेतकरी उन्हाळी हंगामातील रब्बी हंगामात दुबार भातशेती लागवड करत दुबार पीक घेतात त्यांना वेळेवर खत विक्रेतेंकडून युरिया खत मिळत नसल्यामुळे कामे खोळंबली असल्याचे बोलले जात आहे.तर खतांचा तुटवडा होत असलेल्या गोष्टींना जबाबदार कोण असा प्रश्न बळीराजा शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यातील खांब कोलाड वरसगाव परिसरात शेतकरी कालव्याच्या पाण्यावर दुबार भात पीक घेतात तर मागील डिसेंबर सरता कुंडलिकेच्या उजवा, डावा तिर कालव्याला पाटबंधारे खात्याने पाणी देखील सोडले तद्नंतर येथील शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याची भात लागवडीची धूम सुरू असतांनाच रासायनिक युरिया खत बाजारात तसेच खत विक्रेत्यांकडे खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर खत पुरवठा करणारे विक्रेते हे शेतकऱ्यांना किरकोळ खत विक्री करत असल्याने त्यासाठी बळीराजाला जादा पैसे मोजावे लागत आहेत त्यातच लूट म्हणून चढ्या भावाने विक्री करत आहेत शेतकऱ्यांना गोण्याच्या गोण्या लागणारे युरिया खत किलो दोन किलो खताने त्यांचे काय भागणार नाही. वेळेवर युरिया खत उपलब्ध होत नसळताने भात लागवडीनंतर तसेच काही शेतकरी भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजी लागवड देखील मोठया प्रमाणात करतात त्याला देखील खताचा मात्रा जो टाकण्यात येतो मात्र त्यासाठीच शासनाचा खत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच त्याबाबतची मोठी बोंब सुरू आहे.

प्रतिक्रिया
राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात या ना त्या कारणाने बळीराजा हतबल होत आहे तर शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा कोण करणार त्यावर कोणाचे नियंत्रण आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा मिळतच नाही, आजच्या घडीला युरिया खताचा तुटवडा आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकरी वर्गाला त्याच्या पिकांसाठी उन्हाळी हंगामातील दुबार पिकासाठी खत विक्रेते यांच्या कडे पुरेसा खत उपलब्ध नसल्याने ते किरकोळ खत विक्री करत आहेत त्यात ते घाऊक दराने मिळणारे खताची 50 किलोची पिशवीला तीनशे ते चारशे रुपयात विक्रीत शेतकऱ्यांना मिळते परंतु ते न करता किरकोळ भावात रूपांतर करत ते प्रति १० ते १५ रुपये किलो दराने राजरोस पणे विक्री करत आहेत त्यामुळे खत विक्रेत्यांपुढे आता बळीराजा हतबल झाला आहे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत सावंत यांनी सांगितले आहे .

Exit mobile version