बोर्लीपंचतन रुग्णालयात औषधांचा तुटवडा

| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील जनतेला प्रथम उपचारासाठी बोर्ली शहराच्या प्राथमिक रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. मात्र, छोट्या – मोठ्या अपघातात आणि आजारात लागणार्‍या औषधांचा साठा संपल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. बोर्लीपंचतन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी कित्येक वर्ष ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. कारण महिन्याभरात 1400 पेक्षा अधिक रुग्णांनी येथे उपचार केल्याचे ओपीडी च्या नोंदनी संख्येमुळे कळते, मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक असणारा उपचार, तो हि मिळत नसल्याची ओरड आहे. रुग्णालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. येथील रुग्णालयाची भव्य इमारत उभी आहे. मात्र, नागरिकांना पुरवण्यात येणार्‍या प्राथमिक सुविधांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असून यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

बदलत्या वातावरणामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या आजारातील रुग्ण तसेच दैनंदिन कामात अचानक होणार्‍या दुखापतीमुळे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी असते. मात्र, रुग्णांच्या जखमेवर ड्रेसिंग करण्यापूरतेच उपचार होत असून, आवश्यक असणार्‍या टी टी. ) तसेच डाईक्लो अशा औषधांचा तुटवडा असल्याने बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे सध्या हाल सुरू आहेत.

बोर्लीपंचतन येथील रुग्णालयात हाताला दुखापत झाली असता तात्पुरता उपचार म्हणून ड्रेसिंग करण्यात आले होते. यावर लागणारे टी. टी. व डाईक्लो इंजेक्शन उपलब्धता नसल्याने बाहेरून आणण्यास सांगितले. – संजय कांबळे, वडवली

Exit mobile version