कोप्रोली आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा

गोरगरीब रुग्णांचे हाल, ठराविक गोळ्या-औषधांचा वापर

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा पाहायला मिळत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, रुग्णांना मेडिकलमधून औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब गरीब जनता त्रस्त झाली आहे.

गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनाने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये, व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावा म्हणून आरोग्य विभागाकडून 400 पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो. मात्र, तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा पाहायला मिळत आहे एकतर डॉक्टरांची कमी त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. सध्या औषध उपलब्ध नाहीत नंतर येतील त्यामुळे बाहेरून औषधे विकत घ्या असे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणार्‍या भोंगळ कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रूग्णांचा जीव टांगणीला लागला असून प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था रोज मेरे त्याला कोण रडे अशी झाली असेल तर गोरं गरीबांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या सदर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या माध्यमातून गोळ्या लिहून दिल्या जातात मात्र औषध घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गेल्यानंतर औषध देणारे कर्मचारी ह्या गोळ्या बाहेरून घ्या, असे गोरगरीब जनतेला सांगत आहेत. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमेवरील औषधे, टीबी, बीपी वरील देखील गोळ्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दहा गोळ्या लिहून दिल्या असता आरोग्य केंद्रातील औषध देणारे कर्मचारी फक्त चारच गोळ्या देत आहेत. अनेकदा औषध असून देखील नाही असल्याचे देखील हे कर्मचारी सांगत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मीना रामभाऊ पाटील
रहिवासी

आमच्याकडून औषध पुरवठा व्यवस्थित केला गेला आहे. मात्र जर तशी काही परिस्थिती असेल तर त्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल.

डॉ मनीषा विखे
कम्युनिटी मेडिसिन जिल्हा आरोग्य अधिकारी
Exit mobile version