चिरनेर शाखेत पैशांचा तुटवडा

। उरण । वार्ताहर ।

बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नाही. त्यामुळे खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे हात हलवत घरी परतावे लागत असल्याने खातेदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. चिरनेर पंचक्रोशीतील हजारो गरीब गरजू खातेदार रहिवाशांनी आप आपल्या पैशाची सुरक्षित ठेव म्हणून तसेच गरजेच्या वेळी ठेव केलेले पैसे वेळेवर मिळावे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिरनेर येथे जमा केली आहे. परंतु, बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना गरज असताना वेळेवर स्वतः चे पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेतून हात हालवित घरी परतावे लागत असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखे बद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

Exit mobile version