निधी लाटणार्‍यांना जागा दाखवा- संदेश पारकर

। कणकवली । वृत्तसंस्था ।

आमदार नीतेश राणे यांनी बेंचेस घोटाळा करून कोट्यवधींचा मलिदा खाल्ला आहे. अशा प्रवृत्तींना या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन महाविकास आघाडी कणकवली विधानभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले. पारकर हे पियाळी गावातील बुद्धविहार येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील कदम, प्रवीण कदम, संजय बंदरकर, राहुल कदम, विकास कदम, शरद नारकर आदी उपस्थित होते.

पारकर म्हणाले, केवळ तीन ते चार हजार रुपयांना मिळणारी बेंचेस, राणे यांनी आपल्या ठेकेदारामार्फत 12 हजार रुपयांना घेण्यास समाजकल्याण विभागाला भाग पाडले. एवढेच नव्हे तर समाजकल्याण खात्याच्या निधीतून आलेल्या या बेंचेसवर आपले नाव टाकले. आम्ही आंदोलन, मोर्चा काढल्यानंतर ही नावे हटविली. अजूनही काही बेंचवर राणेंचे नाव आहे. या योजनेत भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा राणे आता निवडणुकीत वापरत आहेत. राणेंचे कार्यकर्ते रात्री अपरात्री येऊन पैसे वाटप करत आहेत. मात्र, अशांना गावातून पळवून लावायला हवे.

या सभेवेळी पियाळी येथील सामाजिक कार्यकर्ते समीर तेली, विश्‍वनाथ कदम, संजय कदम, भाऊ कदम, प्रवीण कुडतरकर, रवींद्र गुरव, मधुकर गुरव, बबन नारकर, बाळा नारकर, सिद्धेश राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, तोंडवली येथील प्रचार सभेवेळी पारकर यांच्यासमवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रवीण कुडतरकर, प्रवीण गुरव, समीर तेली, संजय बंदरकर, सिद्धेश राणे, तात्या निकम, आबू मेस्त्री आणि तोंडवली गावातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील उमेश हुले, सुनील हुले, अश्‍विन हुले, ओंकार हुले, रावजी हुले, शुभम हुले, अमित कोलते, सुनील भिसे आदींनी बबन नारकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत संदेश पारकर यांनी केले.

Exit mobile version