आंबेपूर येथील श्रद्धा मोरे हिचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर येथील 25 वर्षीय तरुणी श्रद्धा केशव मोरे हिचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले. तिच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या श्रद्धा मोरे हिने बीएससी ऍग्रीकल्चर शिक्षण पूर्ण केल्यावर शासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. पुणे येथे ती शिक्षण घेत होती. परंतु, अचानक आजारी पडल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दि. 8 जानेवारी रोजी तिचे उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवार, दि. 18 जानेवारी रोजी आंबेपूर येथील राहत्या घरी दशक्रिया विधी होणार असल्याची माहिती मोरे कुटुंबियांकडून देण्यात आली.

Exit mobile version