जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे महाड येथे श्रमदान

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून कौतुक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाड व परिसरात पूरस्थितीने हाहाकार उडवला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात श्री क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे प्रशासनाने सुचविलेल्या भागात महाड येथील पुरग्रस्थ परिसरात साफ सफाई/स्वच्छता श्रमदान करण्यात आले.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज्यांच्या “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या शिकवणीने प्रेरित होऊन आठ हजारांहून अधिक कार्यकर्ते व भक्तगण या स्वच्छता श्रमदान सेवेमध्ये सहभागी झाले होते .
या स्वच्छता मोहिमे दरम्यान महाड तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये महाड बाजारपेठ ते दादरी पूल, कंधार क्रीडांगण, चवदार तळे ते सारेकर आळी, खासगी हॉस्पिटल , शासकीय कार्यालये (प्रांत ऑफिस , सरकारी हॉस्पिटल , कोर्ट , पोलीस स्टेशन ) यांचा समावेश होता. जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे स्वच्छता मोहीम सुरु असताना महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, आमदार रोहित पवार, आमदार अनिकेत तटकरे तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्षात भेट देऊन जगद्गुरू श्रींच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
या स्वच्छता मोहिमेसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे कार्यकर्ते, रायगड जिल्हा सेवा समिती, मुंबई झोनमधील सर्व जिल्हे आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपथित होते. या स्वच्छता सेवे दरम्यान महाड नगरपालिकेने स्वच्छतेसाठी लागणारे विविध साहित्य देऊन मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version